सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावर आधारित २ शोधनिबंध सप्टेंबर २०२३ या मासामध्ये वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर

‘दैवी आणि दानवी – हिंदु अन् नाझी स्वस्तिक यांच्या आध्यात्मिक अंगांचा तुलनात्मक अभ्यास’, या संशोधनाला ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरणा’चा पुरस्कार प्राप्त

वरील पहिल्या शोधनिबंधाचे सहलेखक ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे मुख्य सदस्य) आणि दुसर्‍या शोधनिबंधाच्या सहलेखिका सौ. श्वेता क्लार्क आहेत. श्री. क्लार्क यांनी सादर केलेल्या शोधनिबंधाला परिषदेत ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. ऑक्टोबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने १८ राष्ट्रीय आणि ९१ आंतरराष्ट्रीय अशा एकूण १०९ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण’ पुरस्कार मिळाले आहेत.