|
जळगाव – जिल्ह्यातील फैजपूर आणि रावेर तालुक्यांतील खिर्डी बुद्रुक येथील २ अल्पवयीन धर्मांधांनी फेसबुक खात्यावरून छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री हनुमान यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली. त्यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. या दोन्ही गावांत सध्या शांतता असून २ दंगल नियंत्रक पथके तैनात करण्यात आली आहेत. (अशा धर्मांधांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी. ते अल्पवयीन आहेत; म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे टाळू नये, अशीच हिंदूंची मागणी आहे ! – संपादक)
१. प्रारंभी फैजपूर येथे शिवरायांच्या विरोधात अल्पवयीन धर्मांधाने आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्यानंतर हिंदुत्वनिष्ठ पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी धर्माधांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या वेळी अल्पवयीन धर्मांधाने ‘अशी आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा प्रसारित करणार नाही’, असे सांगून हिंदुत्वनिष्ठांची क्षमा मागितली.
२. दुसर्या दिवशी पुन्हा त्याच फेसबुक खात्यावरून हनुमानाविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली. हे पाहून हिंदुत्वनिष्ठ आणखी संतप्त झाले. त्यांनी धर्माधांवर कठोर कारवाईची मागणी केली.
शिवप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि ग्रामस्थ यांचे पोलीस ठाण्यात आंदोलन !
घटनेची माहिती समजल्यानंतर निंभोरा पोलीस ठाण्यात खिर्डी, निंभोरा, वाघाडी, रेंभोटा यांसह परिसरातील हिंदुत्वनिष्ठ आणि ग्रामस्थ यांनी पोलीस ठाण्यात येऊन घोषणा देऊन ‘ठिय्या आंदोलन’ केले, तसेच अल्पवयीन धर्मांधांना तात्काळ अटक करून गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. या वेळी फैजपूर येथील पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांनी जमावास शांत करून तक्रारदार हिंदुत्वनिष्ठ स्वप्नील पाटील याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून २ संशयित आरोपींना तात्काळ अटक केली. ‘या पोस्टची सायबर विभाग चौकशी करत आहे’, असे पोलिसांनी सांगितले. (हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलन केल्यानंतर गुन्हा नोंद करणारे पोलीस इतर गुन्ह्यांच्या प्रकरणात जनतेशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेल बरा ! – संपादक)
मोठा गुन्हा असतांनाही पोलिसांनी धर्मांधांवर जुजबी कलमे लावली !
२ अल्पवयीन धर्मांधांनी हनुमान आणि छत्रपती शिवराय यांचा अवमान करणारी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणे हा मोठा गुन्हा असतांनाही पोलिसांनी २ अल्पवयीन धर्मांधांच्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम १५३ (अ) (२ धर्मियांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे) अंतर्गत जुजबी गुन्हा नोंदवला. वास्तविक पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कलम २९५ (अ) (हेतूपुरस्सर श्रद्धास्थानांचा अवमान करून धार्मिक भावना दुखावणे) अंतर्गत गुन्हा नोंदवणे आवश्यक होते. तसे न झाल्याने हिंदुत्वनिष्ठांनी खेद व्यक्त केला. (अशी घटना हिंदूंकडून घडली असती, तर पोलिसांनी लगेच हिंदूंवर गंभीर कलमे लावून गुन्हा नोंदवला असता. यावरून पोलिसांचा हिंदुद्वेष दिसून येतो ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|