गोवा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या प्रकरणी ३ ख्रिस्त्यांना अटक

संशयितांना ६ दिवसांची पोलीस कोठडी

करासवाडा, म्हापसा येथील नव्याने बसविलेला सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

पणजी, १५ ऑगस्ट (वार्ता.) : करासवाडा, म्हापसा येथील सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची १३ ऑगस्टच्या रात्री अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केली. या घटनेनंतर जनक्षोभ उसळल्यानंतर पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम २९५ (अ), १५३ (अ), कलम ४२७ (आर्./डब्लू.) ३४ अंतर्गत गुन्हा प्रविष्ट केला आहे.
यानंतर पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांच्या सूचनेनुसार उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारांच्या शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले.

(सौजन्य : Goa Plus News Channel) 

यानंतर अन्वेषणाला प्रारंभ होऊन घटनास्थळाच्या आसपासच्या परिसरातील ‘सीसीटीव्ही फूटेज’ गोळा करण्यात आल्या. तांत्रिकदृष्ट्या मिळालेली आणि स्थानिकांकडून मिळालेली माहिती यांच्या आधारे पोलिसांनी १४ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी प्रथम संशयित नायजेल फोन्सेका याला कह्यात घेतले. यानंतर या घटनेमध्ये आणखी २ संशयित सहभागी असल्याचे पोलिसांना समजले आणि यानंतर आलेक्स फर्नांडिस आणि लॉरेन्स मेंडिस या अन्य २ संशयितांनाही कह्यात घेण्यात आले. संशयितांनी दारूच्या नशेत हा प्रकार केल्याची चर्चा आहे. (दारूच्या नशेत ख्रिस्त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चेहर्‍याची तोडफोड करायचे कसे काय समजते ? पोलिसांनी या कावेबाजपणाला बळी पडू नये. मद्याच्या नशेत कृत्य केल्याचे सांगून या प्रकरणातून निर्दोष मुक्त होण्याचे हे षड्यंत्र ओळखावे आणि संशयितांवर कठोर कारवाई होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत ! – संपादक)

(सौजन्य : In Goa 24×7)

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. –  संपादक)

संतप्त जमावाने संशयितांच्या दुकानाची केली तोडफोड

प्राप्त माहितीनुसार १३ ऑगस्टच्या रात्री पुतळ्याची विटंबना केल्यानंतर १४ ऑगस्ट या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. यानंतर शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळून ते घटनास्थळी एकत्र आले. या वेळी संशयितही शिवप्रेमींसमवेत उपस्थित होते. स्थानिक जागरूक शिवप्रेमींनाही संशयितांचा सुगावा लागला होता आणि ते जमावामध्ये उपस्थित असल्याचेही समजले होते; मात्र शिवप्रेमींनी पुरावे एकत्र करण्यासाठी याविषयी कोणताही गाजावाजा केला नाही. पोलिसांना नंतर याविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संशयितांना कह्यात घेतले. पोलिसांनी संशयितांना कह्यात घेतल्यानंतर संतप्त जमावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आलेल्या पुतळ्याजवळील संशयितांच्या दुकानांची मोडतोड केली आणि यानंतर म्हापसा पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने जमून संशयितांवर पोलीस कोणती कारवाई करणार याची माहिती जाणून घेतली.

संपादकीय भूमिका

  • यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू कोण आहेत ? ते ओळखावे !
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष करणे, हा उघड पोर्तुगीजधार्जिणेपणा आहे !
  • गोवा मुक्तीनंतर ६२ वर्षांनी अशा प्रकारची पोर्तुगीजधार्जिणी पिलावळ गोव्यात असणे दुर्दैवी !
  • गोव्यातील जातीय सलोखा कोण बिघडवत आहे, ते यातून दिसून येते !

सविस्तर वृत्त वाचा –

गोवा : करासवाडा, म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना !
https://sanatanprabhat.org/marathi/710961.html