टीईटी गैरव्‍यवहार परीक्षेतील उमेदवारांना अपात्र करावे !

विद्यार्थी संघटनेची मागणी

पुणे – वर्ष २०१९-२० मध्‍ये झालेल्‍या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) झालेल्‍या गैरव्‍यवहारात ७ सहस्र ८८० उमेदवारांचा सहभाग दिसून आला आहे. त्‍या सर्वांना शिक्षक अभियोग्‍यता आणि बुद्धीमता चाचणी परीक्षेमध्‍ये अपात्र करावे. त्‍यांना शिक्षक भारती ‘पोर्टल’वर नोंदणी करण्‍यास बंदी घालावी, अशी मागणी ‘डी.टी.एड्.बी.एड्. स्‍टुडंट असोेसिएशन’चे संस्‍थापक अध्‍यक्ष संतोष मगर यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्‍याकडे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक)

या गैरव्‍यवहारातील उमेदवारांचे परीक्षेतील गुण रहित करून पुढील पात्रता परीक्षेसाठी कायमस्‍वरूपी प्रतिबंधित करण्‍याचा आदेश राज्‍य सरकारने काढला आहे; परंतु वर्ष २०२३ मध्‍ये घेतलेल्‍या ‘शिक्षक अभियोग्‍यता परीक्षा आणि बुद्धिमता चाचणी परीक्षा या उमेदवारांनी दिली आहे. हे सर्व शिक्षक अपात्र आहेत, तरीही परीक्षा कशी देतात ? असाही प्रश्‍न उपस्‍थित केला आहे.