सातारा जिल्‍हा काँग्रेस कमिटीकडून रस्‍ता बंद  आंदोलनाद्वारे सामान्‍य जनतेला वेठीस धरण्‍याचा प्रयत्न !

पू. भिडेगुरुजी यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍याचे प्रकरण

सातारा जिल्‍हा काँग्रेस कमिटीकडून निषेध आंदोलन

सातारा, ३० जुलै (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी महात्‍मा गांधी यांच्‍याविषयी केलेल्‍या वक्‍तव्‍याचा निषेध व्‍यक्‍त करण्‍यासाठी सातारा जिल्‍हा काँग्रेस कमिटीकडून निषेध आंदोलन करण्‍यात आले. या वेळी सातारा जिल्‍हा काँग्रेस कमिटीने कार्यालयासमोरील रस्‍ता अडवत सामान्‍य जनतेला वेठीस धरण्‍याचा प्रयत्न केला.

कराड येथील राष्‍ट्रीय काँग्रेसचे विद्यमान आमदार पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी विधीमंडळामध्‍ये पू. भिडेगुरुजी यांच्‍याविषयी माहिती दिल्‍यानंतर मोठा गदारोळ झाला. याचेच पडसाद महाराष्‍ट्रातील विविध जिल्‍ह्यांत उमटत आहेत. याचाच एक भाग म्‍हणून सातारा जिल्‍ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कमिटी कार्यालयाबाहेर जमून पू. भिडेगुरुजी यांच्‍या विरोधात घोषणाबाजी करत होते. काँग्रेसच्‍या पदाधिकार्‍यांकडून ऋषितुल्‍य पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या विषयी एकेरी भाषा वापरून अपमानास्‍पद घोषणाबाजी केली.