मी रेल्वेने हुबळीहून भोपाळला जात होतो. त्याच रेल्वेत देहलीतील ‘जमात ए हिंद’ नावाच्या संघटनेचे केरळ आणि कर्नाटक या ठिकाणचे पुष्कळ मुसलमानही प्रवास करत होते. ती रेल्वे अधिकाधिक मुसलमानांनी भरली होती. रात्री १२ वाजता या जमातीचे लोक रेल्वेत चढले. सकाळी ४.३०-५ वाजता या लोकांची चुळबुळ चालू झाली आणि त्यांनी नमाजपठण चालू केले. रेल्वेच्या प्रत्येक डब्यात १५ ते २५ मुसलमान होते. सर्वांनी एकदम नमाजपठण केले, तर त्याला ५ मिनिटे लागली असती; परंतु त्यांनी तसे न करता प्रत्येक जण वेगवेगळ्या वेळी नमाजपठण करत होते. सकाळी ६ वाजेपर्यंत इतर सर्व लोकांच्या अत्यावश्यक क्रिया खोळंबून राहिल्या होत्या. सर्वांनाच त्रास होत होता. भोपाळ येईपर्यंत त्यांनी पहाटे ५.३०, दुपारी १.३०, सायंकाळी ५ आणि रात्री १० वाजता असे ४ वेळा नमाजपठण केले.
– श्री. श्रवण कुमार रायकर, कर्नाटक.