केवळ ५६ टक्‍के भारतीयच ईश्‍वराला मानतात ! – सर्वेक्षण

प्रतीकात्मक छायाचित्र

न्‍यूयॉर्क (अमेरिका) – विविध देशांतील किती टक्‍के लोक ईश्‍वराला मानतात, यासंदर्भात नुकतेच एक सर्वेक्षण करण्‍यात आले. ‘द वर्ल्‍ड ऑफ स्‍टॅटिस्‍टिक्‍स’च्‍या ट्‍विटर खात्‍यावरून या संदर्भातील आकडेवारी मांडण्‍यात आली आहे. या आकडेवारीत इंडोनेशिया सर्वांत वर असून तेथील ९३ टक्‍के लोकांची ईश्‍वरावर श्रद्धा आहे. त्‍यानंतर तुर्कीये ९१ टक्‍के, ब्राझिल ८४ टक्‍के, दक्षिण आफ्रिका ८३ टक्‍के, तर पाचव्‍या क्रमांकावर मेक्‍सिको या दक्षिण अमेरिकी देशाचा क्रमांक असून ७८ टक्‍के मेक्‍सिकन देवावर श्रद्धा ठेवतात. या सर्वेक्षणानुसार भारत आठव्‍या क्रमांकावर असून केवळ ५६ टक्‍के भारतीय नागरिकच ईश्‍वराला मानतात.

संपादकीय भूमिका

भारतियांमधील श्रद्धा अल्‍प असण्‍यामागील प्रमुख कारण हे बहुसंख्‍यांक असलेले हिंदूच होत, हे स्‍पष्‍ट आहे. त्‍यामुळे मानवाला चिरंतन आनंदाची प्राप्‍ती करून देणार्‍या हिंदु धर्माविषयी आस्‍था नसणारे हिंदू हे कर्मदरिद्रीच होत !

हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव आणि स्‍वातंत्र्यापासून आतापर्यंत कोणत्‍याच शासनकर्त्‍याने हिंदूंना साधना न शिकवल्‍याचाच हा परिणाम होय, हे जाणा !