समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे विधान

(म्‍हणे) ‘काश्‍मीरमध्‍ये केवळ ८९ हिंदु पंडित हुतात्‍मा झाले !’

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी

मुंबई – ‘द काश्‍मीर फाइल्‍स’ हा चित्रपट खोट्या कथेवर आधारित आहे. मागील ३० वर्षांत काश्‍मीरमध्‍ये ७००-८०० मुसलमान मारले गेले आहेत आणि केवळ ८९ हिंदु पंडित हुतात्‍मा झाले आहेत, असे विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी महाराष्‍ट्राच्‍या विधानसभेत केले. याला भाजप आणि शिवसेना यांच्‍या आमदारांनी आक्षेप घेतला.

मालेगाव स्‍फोटातील आरोपी साध्‍वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहित यांना सोडण्‍याचा प्रयत्न चालू आहे. हा कायदा आणि सुव्‍यवस्‍था यांचा प्रश्‍न आहे. केरळमधील महिलांवर जसा चित्रपट बनला, तसा मणीपूरमधील पीडित महिलांवरही चित्रपट यायला हवा, असे विधान अबू आझमी यांनी केले. या वेळी अबू आझमी यांनी ‘केवळ ८९ हिंदु पंडित हुतात्‍मा झाले’ या उल्लेखाला भाजप आणि शिवसेना यांच्‍या आमदारांनी आक्षेप घेतला.

भाजपचे अतुल भातखळकर यांनी ‘या सदनात भाषण करण्‍याआधी ‘वन्‍दे मातरम्’ म्‍हणणार का ? हे सांगा’ असे त्‍यांना आवाहन केले. ‘‘राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचा टी.व्‍ही. चॅनेलवाला चौहान यांच्‍यावर १ सहस्र ८४५ गुन्‍हे प्रविष्‍ट आहेत. त्‍यांच्‍या द्वेषामूलक भाषणांच्‍या विरोधात कठोर कारवाई व्‍हायला हवी’’, असे अबू आझमी म्‍हणाले. या वेळी भाजप आणि शिवसेना यांच्‍या आमदारांनी ‘‘इस देश मे रहना होगा, तो ‘वन्‍दे मातरम्’ कहेना होगा’’, अशा घोषणा दिल्‍या.