चेन्नई – ‘इस्लामिक स्टेट’ या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेच्या एका आतंकवाद्याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने नुकतीच तमिळनाडूमधून अटक केली. केरळमधील हिंदूंची धार्मिक स्थळे आणि नेते यांच्यावर आक्रमण करण्याची त्याची योजना होती. राज्यात आतंकवाद पसरवणे आणि जातीय तेढ निर्माण करणे, हा इस्लामिक स्टेटचा उद्देश होता. त्याचा हा डाव हाणून पाडण्यासाठी त्रिशूरमधील ३ आणि पलक्कडमधील एका ठिकाणी धाडी घालण्यात आले, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या प्रवक्त्याने दिली. तत्पूर्वी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने आरोपींपैकी एक आशिफ उपाख्य अश्रफ याला तमिळनाडूतील सत्यमंगलम् येथून अटक केली.
तमिलनाडु से अरेस्ट हुआ ISIS का आतंकी: NIA ने बताया नेताओं पर हमले की कर रहा था प्लानिंग, 4 जगह छापामारी हुई#Tamilnadu https://t.co/FFMDTpazpQ
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) July 21, 2023
दुसर्या दिवशी आशिफसमवेत सय्यद नबील अहमद, त्रिशूरचे शिया टी.एस्. आणि पलक्कड येथील रईश यांच्या घरांची झडती घेण्यात आली. या वेळी संशयास्पद आधुनिक उपकरणे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेला आरोपी आशिफ हा इस्लामिक स्टेटच्या आतंकवादी कारवायांसाठी पैसा गोळा करण्यात गुंतलेला होता.
संपादकीय भूमिकाआतंकवाद्यांवर वचक बसेल, अशी कारवाई होत नसल्यामुळेच त्यांचे मनोबल वाढते आणि ते वारंवार विध्वंसक कृत्ये करू धजावतात ! |