कर्नाटकमधील गोरक्षकांवर खोटा गुन्‍हा नोंदवल्‍या प्रकरणी उच्‍च न्‍यायालयाकडून गोरक्षकांना जामीन संमत

१. कर्नाटकमध्‍ये गोतस्‍कराची हत्‍या केल्‍याप्रकरणी गोरक्षकांवर खोटा गुन्‍हा नोंद

‘कर्नाटकमध्‍ये गोतस्‍करी करणार्‍या इद्रिस पाशा या धर्मांधाची हत्‍या केल्‍याचा  आरोप गोरक्षकावर करण्‍यात आला होता. त्‍यामुळे भारतभरात सर्व पुरोगामी आणि धर्मांध यांनी ‘मॉब लिंचिंग’ (समूह हत्‍या) झाल्‍याची ओरड केली. त्‍यातील खरी घटना अशी आहे की, अर्जदार पवन कुमार ए.एन्. आणि पी. लिंगप्‍पा हे दोघे १.४.२०२३ या दिवशी बेंंगळुरू येथून मैसुरू येथे चालले होते. तेव्‍हा त्‍यांना १६ गोवंश, गोवत्‍स आणि गोमाता निर्दयीपणे एका वाहनात कोंबलेले दिसले. त्‍या वेळी ‘गोवंश हत्‍याबंदी’ आणि ‘पशूंची क्रूरताबंदी’ कायदा लागू होता. त्‍यामुळे त्‍यांनी याविरोधात तक्रार प्रविष्‍ट केली. त्‍यानंतर धर्मांधांनीही गोरक्षकांच्‍या विरोधात खोटी तक्रार प्रविष्‍ट केली. त्‍यांच्‍या तक्रारीवरून अर्जदार गोरक्षकाविरुद्ध गुन्‍हा नोंदवण्‍यात आला. त्‍यात इद्रिस पाशा याची हत्‍या केल्‍याचा आरोप करण्‍यात आला. त्‍याप्रमाणे एप्रिलमध्‍ये पोलिसांनी त्‍यांना अटक केली. ते १६.५.२०२३ पर्यंत कारागृहात होते. त्‍यांचा जामीन अर्ज तालुका आणि जिल्‍हा सत्र न्‍यायालयाने फेटाळला. त्‍याविरोधात त्‍यांनी बेंगळुरू उच्‍च न्‍यायालयामध्‍ये याचिका केली. त्‍यात त्‍यांनी म्‍हटले, ‘‘इद्रिस पाशा आणि इरफान हे गोतस्‍करी करत होते. तरीही पोलिसांनी दबावाखाली येऊन खोट्या पद्धतीने आमच्‍याविरुद्ध गुन्‍हा नोंदवला. आम्‍ही गोतस्‍करांविरुद्ध आधी गुन्‍हा नोंदवला होता. त्‍याला प्रत्‍युत्तर म्‍हणून गोतस्‍करांनी आमच्‍याविरुद्ध खोटा गुन्‍हा नोंदवला. वास्‍तविक इद्रिस पाशाचा मृत्‍यू हृदयविकाराच्‍या झटक्‍याने झाला होता. एकंदरीतच त्‍याचा मृत्‍यू हा संशय उत्‍पन्‍न करणारा होता. त्‍यामुळे त्‍याच्‍या मृत्‍यूचा दोष कुणाच्‍या माथी मारणे चुकीचे आहे. त्‍यामुळे आम्‍हाला जामीन द्यावा.’’

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

२. बेंगळुरू उच्‍च न्‍यायालयाकडून गोरक्षकाला जामीन संमत

या याचिकेची सुनावणी बेंगळुरू उच्‍च न्‍यायालयामध्‍ये झाली. यात उच्‍च न्‍यायालय म्‍हणाले, ‘‘अर्जदार गोरक्षकाने इरफान आणि इद्रिस पाशा या तस्‍करांविरुद्ध सर्वप्रथम तक्रार प्रविष्‍ट केली होती. तरीही त्‍याचा क्रमांक खाली देण्‍यात आला. त्‍यांचा गुन्‍हा नोंदवायला पोलिसांनी १० घंटे लावले. त्‍या कालावधीत धर्मांध गोतस्‍कराची तक्रार घेऊन गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आणि अर्जदार गोरक्षकांना आरोपी बनवून कारागृहात डांबले.’’ उच्‍च न्‍यायालयाने या सर्व घटनाक्रमाचा विचार केला.

न्‍यायालयाने त्‍यांच्‍या आदेशामध्‍ये असे नमूद केले, ‘‘सईद जहीर याच्‍या वतीने गोरक्षक पवन कुमार आणि पी.लिंगप्‍पा एन्. यांच्‍याविरुद्ध दुपारी ४ वाजता इद्रिस पाशाची हत्‍या केल्‍याचा गुन्‍हा नोंदवून घेतला; मात्र सईद आणि अन्‍य ४ लोक बेकायदेशीरपणे गोमाता अन् गोवंश यांची तस्‍करी करत होते. त्‍यांच्‍या विरुद्धचा गुन्‍हा नोंदवायला विलंब लावला आणि धर्मांधांच्‍या तक्रारी नोंदवून गोरक्षक अर्जदारालाच कारागृहात पाठवले.’’ उच्‍च न्‍यायालयाने शवविच्‍छेदनाचा अहवाल पाहिला. त्‍यात त्‍यांना मृतक इद्रीस पाशाच्‍या देहावर केवळ ४ किरकोळ इजा दिसल्‍या. तक्रारीत नमूद केलेली मारहाण आणि शवविच्‍छेदनाचा अहवाल यात कुठेही ताळमेळ दिसत नव्‍हता. त्‍यामुळे ‘पवन कुमार यांना कारागृहात किंवा न्‍यायालयीन कोठडीमध्‍ये डांबून ठेवणे, हे त्‍यांच्‍या वैयक्‍तिक स्‍वातंत्र्यावर आणि जीवन जगण्‍याच्‍या अधिकारावर गदा आणणे आहे’, असे सांगत उच्‍च न्‍यायालयाने त्‍यांचा जामीन संमत केला.

३. हिंदूंवरील अन्‍याय रोखण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्राखेरीज पर्याय नाही !

एकंदरीतच भारतभरात धर्मांधांनी हिंदूंच्‍या कितीही हत्‍या केल्‍या, तरी त्‍यावर कधीही भाष्‍य होत नाही. ‘सर तन से जुदा’च्‍या (डोके शरिरापासून वेगळे करणे) घोषणा देत कितीही हत्‍या झाल्‍या किंवा दंगलीत हिंदूंना मारले, तरी त्‍याची बातमी होत नाही. प्रत्‍येक वेळी धर्मांधांना पाठीशी घातले जाते. याउलट एखाद्या वेळी अपकृत्‍यामुळे धर्मांधाला मारहाण झाली किंवा तो अन्‍य कारणांनी मृत झाला, तर गदारोळ माजवला जातो. या सर्व घटना म्‍हणजे हिंदूंविरुद्धच्‍या खोट्या कथानकाचा (‘नॅरेशन’चा) भाग आहे. गुजरातमध्‍ये काही वर्षांपूर्वी झालेल्‍या दंगली हा त्‍या षड्‍यंत्राचा भाग आहे. ‘ती गोध्रा हत्‍याकांडाची प्रतिक्रिया होती’, असे कुणी म्‍हणत नाही. अशा घटना हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करणे अनिवार्य करतात. आता गोरक्षकाला जामीन मिळाल्‍यानंतर प्रसारमाध्‍यमे आणि पुरोगामी नेहमीप्रमाणे सर्व शांत आहेत.’

श्रीकृष्‍णार्पणमस्‍तु !

– (पू.) अधिवक्‍ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्‍च न्‍यायालय (१३.६.२०२३)