६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के वीज वापरली, तर पेट्रोलची किंमत १५ रुपये लिटर होऊ शकते !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दावा !

प्रतापगड (राजस्थान) – ६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के वीज वापरली गेली, तर पेट्रोलची किंमत १५ रुपये लिटरपर्यंत अल्प होऊ शकते. त्यामुळे देशातील इंधनाची आयातही न्यून होईल आणि पैसा सरकारकडे जाईल. हा निधी शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी वापरता येऊ शकतो, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे एका कार्यक्रमात  केले.

गडकरी पुढे म्हणाले की, भारतात इंधनाची आयात १६ लाख कोटी रुपयांची आहे. ही आयात अल्प केल्यास हा पैसा विदेशात जाण्याऐवजी शेतकर्‍यांच्या घरी जाईल. ऊसापासून इथेनॉलची निर्मिती केली जाते आणि भारतात लाखो ऊस उत्पादक शेतकरी आहेत, ज्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हे आहे. त्यामुळे असे झाल्यास शेतकर्‍यांना मोठा लाभ होईल.