परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘ब्रह्मोत्‍सवा’त काही साधक आणि संत यांच्‍या मनोगताच्‍या माध्‍यमातून साधकांना साधनेचा प्रायोगिक भाग शिकवणे

३ जुलै २०२३ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा झाली, त्‍या निमित्ताने…

श्री. राम होनप

‘११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी (गोवा) येथील मैदानात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्‍सव’ होता. त्‍या वेळी विविध जिल्‍ह्यांतून सहस्रो साधक आले होते. त्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी पुढील साधक आणि संत यांना मनोगत व्‍यक्‍त करण्‍यास सांगितले, ‘पू. सुनीता खेमका (सनातनच्‍या ८४ व्‍या संत, वय ६२ वर्षे) त्‍यांचे पती पू. प्रदीप खेमका ( सनातनचे ७३ वे संत, वय ६३ वर्षे), पू. संजीव कुमार (सनातनचे ११५ वे संत, वय ७२ वर्षे), पिंताबरी उद्योग समूहाचे संचालक श्री. रवींद्र प्रभूदेसाई (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ६० वर्षे, ठाणे), अधिवक्‍ता कृष्‍णमूर्ती पंजीतडका (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के, कर्नाटक)’ प्रसारातील साधकांना साधना करतांना मनात पुढील प्रश्‍न येतात, ‘व्‍यावहारिक आणि सांसारिक जीवन जगतांना साधना कशी करायची ? त्‍यातील अडचणी कशा सोडवायच्‍या ? भाव कसा ठेवायचा ? अहं निर्मूलनासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, या सर्व प्रश्‍नांची उत्तरे वरील साधक आणि संत यांच्‍या मनोगतातून सर्व साधकांना मिळाली. परात्‍पर गुरु डॉक्‍टर काही साधक आणि संत यांचे आदर्श समोर ठेवून साधकांना साधनेचा प्रायोगिक भाग शिकवतात. ही पद्धत असाधारण आणि वैशिष्‍ट्यपूर्ण आहे.’

–  श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.५.२०२३)