इस्लामाबाद – नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्यावर गेले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चाही केली. या दौर्यात अमेरिकेशी भारताने महत्त्वाचे करार केले आहेत. त्यात भारताचे लढाऊ विमान ‘तेजस’साठी भारतात जीई इंजिन निर्माण करणे, भारताला अत्याधुनिक ड्रोन्स पुरवणे, संरक्षण साधनांच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करणे इत्यादी करारांवर स्वाक्षर्या करण्यात आल्या. यामुळे पाकिस्तानला धक्का बसला आहे. ‘भारत आणि अमेरिका यांच्यातील हे संरक्षण करार आणि परस्पर सहकार्य आमच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहेत’, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या विरोधात भारतधार्जिणी वक्तव्ये करू नयेत, अशा शब्दांत पाकने यापूर्वी त्याचा जळफळाट व्यक्त केला होता.
भारत-अमेरिका की दोस्ती से बौखलाया पाकिस्तान, कहा- ये हमारे मुल्क के लिए खतरा और हम… #India #US #Pakistan https://t.co/yI0BaqLDbV
— ABP News (@ABPNews) June 30, 2023
पाकिस्तानने अमेरिकेला पाठवला संदेश
अमेरिकेने पाकिस्तानची चिंताही विचारात घ्यायला हवी. या चिंतेकडे दुर्लक्ष करून भारताला अत्याधुनिक सैनिकी तंत्रज्ञान मिळाल्यास दक्षिण आशियामध्ये अस्थिरता वाढेल आणि पारंपरिक संतुलन कमकुवत होईल. (चोराच्या उलट्या बोंबा ! आशिया खंडात अस्थिरता भारतामुळे नव्हे, तर पाकमुळे वाढते, हे त्याने लक्षात घ्यावे ! – संपादक) तंत्रज्ञान हस्तांतरणामुळे भारत सशक्त बनेल. यामुळे पाकिस्तानची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येईल, असे पाकिस्तानने अमेरिकेला पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाअमेरिकेने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात युद्ध सामग्री पुरवली आहे. त्यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात येते, त्याचे काय ? |