अमेरिकेची ‘जीई एरोस्पेस’ आणि ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स’ या आस्थापनांत करार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकी दौरा !

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकी दौर्‍याच्या वेळी दोन्ही देशांमध्ये संरक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण करार झाला आहे. अमेरिकेची ‘जीई एरोस्पेस’ आणि ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ यांच्यात २२ जून या दिवशी हा करार झाला. यांतर्गत भारतीय वायुदल आणि नौदल यांच्या लढाऊ विमानांच्या इंजिनची निर्मिती आता भारतात करण्यात येणार आहे.

या कराराच्या अंतर्गत ‘एफ् ४१४’ नावाच्या इंजिनचा समावेश असून भारतीय वायूदलाच्या ‘एम्.के.२’ या विमानाचा हा भाग आहे. ‘जीई एरोस्पेस’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एच्. लॉरेंस कल्प ज्युनियर यांनी म्हणाले, ‘‘या करारामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक देवाण-घेवाणीला गती प्राप्त होईल. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या उभय देशांमध्ये जवळीक निर्माण व्हावी, हे स्वप्नाला आम्ही केलेल्या या करारामुळे साकार करणे सोपे होईल.’’