‘सतत शिकण्याच्या स्थितीत राहून गुणवृद्धी करावी आणि कृतज्ञताभावात रहावे’, असे तळमळीने सांगणारी ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असणारी पुणे येथील कु. प्रार्थना महेश पाठक (वय १२ वर्षे) !

‘एकदा दैवी सत्संगात कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १२ वर्षे,) हिने ‘इतरांचा विचार करणे, चुकांविषयी संवेदनशीलता आणि खंत कशी असावी ?’ याविषयी सूत्रे सांगितली. ती पुढे दिली आहेत.

कु. प्रार्थना पाठक

१. समष्टी सेवा करतांना ‘इतरांचा विचार करणे’ महत्त्वाचे असणे

‘एखाद्या सेवेत आपल्याला सहसाधकाला महत्त्वाचा निरोप द्यायचा आहे; परंतु तो आपल्याकडून द्यायचा राहिला, तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. एखादा निरोप वेळेवर पुढे कळवला गेला नाही, तर आपल्यामुळे समष्टी सेवा करणारे अनेक साधक सेवेपासून वंचित राहू शकतात’, असा इतरांचा विचार केला पाहिजे. त्यानंतरच आपली सेवा परिपूर्ण होऊ शकते. कुठलीही सेवा करण्यापूर्वी ‘मी माझ्या सहसाधकांचा किंवा दायित्व असणार्‍या साधकांचा कसा विचार करू शकते ?’, याचे चिंतन लिहून काढले, तर आपल्यात लहान लहान सेवा करतांनाही ‘इतरांचा विचार करणे’, हा गुण निर्माण होईल.

२. चुकांविषयी खरी ‘खंत’ वाटणे आवश्यक

आपल्याकडून झालेली चूक पुन्हा होऊ नये, यासाठी आपण १०० टक्के झोकून देऊन प्रयत्न करतो, तीच खरी ‘खंत’ वाटल्याने केलेली कृती आहे. आपण चूक झाल्यावर त्यातून शिकतो आणि सकारात्मक राहून प्रयत्न करतो, ती खरी खंत आहे. चूक झाल्यानंतर ‘रडणे, वाईट वाटून निराश होणे आणि नकारात्मक विचार करणे’, ही खंत नसून ‘भावनाशीलता’ आहे. आपण शिकण्याच्या स्थितीत असलो, तर आपल्याकडून झालेल्या चुकीतूनही आपण शिकू शकतो आणि आनंद घेऊ शकतो. आपल्याला आपली चूक लक्षात आल्यावर किंवा कुणी आपल्याला चुकीची जाणीव करून दिल्यावर लगेचच आपण श्री गुरूंची क्षमायाचना करू शकतो.

कु. अपाला औंधकर

३. समष्टी सेवा करतांना ‘गुरुधनाप्रती’ सतत कृतज्ञताभाव ठेवावा !

आपण समष्टी सेवा करतांना आश्रमातील अनेक वस्तूंचा वापर करतो, उदा. पंखा, दीपदंड (ट्यूबलाईट), संगणक, आसंदी. हे सर्व गुरुधन आहे. या सर्व वस्तू आणि परात्पर गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) कृपा यांमुळे आपल्याला समष्टी सेवा सहजपणे करता येते. त्यामुळे या गुरुधनाप्रती सतत कृतज्ञता व्यक्त करत राहूया. गुरुधनाची हानी आपल्याकडून होणार नाही, याची काळजी घेऊन कृतज्ञताभावात रहाण्याचा प्रयत्न करूया.

४. सकारात्मक विचार न करता प्रतिक्रिया व्यक्त केल्यामुळे आपल्या साधनेची हानी होते

‘हे कृपाळू गुरुमाऊली, कु. प्रार्थनाच्या माध्यमातून आपलीच वाणी कार्यरत होते. आम्हालाही याप्रमाणे प्रयत्न करून आपल्या चरणी अर्पित होता येऊ दे. हे नारायणा, तूच आम्हाला ही सुंदर सूत्रे सांगून जणू साधनेसाठी ऊर्जाच दिली आहेस. याबद्दल तुझ्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– परात्पर गुरुदेवांची,
कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), फोंडा, गोवा. (२३.३.२०२३)