बैठक संपल्यावर मुख्यमंत्र्यांच्या आधी खुर्चीवरून उठलेल्या पोलीस अधीक्षकांवर ओरडून त्यांना पुन्हा बसण्यास सांगितले !
दावणगेरे (कर्नाटक) – येथील जिल्हा पंचायत कार्यालयात झालेल्या अधिकार्यांच्या बैठकीत काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पोलीस अधीक्षक डॉ. के. अरुण यांचा अवमान केला. बैठक संपल्यावर डॉ. के. अरुण हे मुख्यमंत्री उठण्यापूर्वीच खुर्चीवरून उठले. हे पाहून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पारा चढला आणि त्यांनी पोलीस अधीक्षकांना, ‘ए, बस. मी अजून बसलो आहे.’ सिद्धरामय्या पुढे म्हणाले, ‘‘तू कसला पोलीस अधीक्षक ? बस खाली. मी उठून गेल्यानंतर उठ. पोलिसांनी नीती आणि नियम पाळावेत.’’ पुन्हा असा प्रकार घडता कामा नये, अशी तंबीही सिद्धरामय्या यांनी दिली.
संपादकीय भूमिकायाला म्हणतात सत्तेचा माज ! पोलीस अधीक्षकांशी असे वागणारे मुख्यमंत्री सामान्य नागरिक आणि कर्मचारी यांच्याशी कसे वागत असतील, याची कल्पना येते ! |