उत्तरकाशीमध्ये धर्मांधांकडून अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न : संतप्त हिंदूंचा विरोध

संतप्त हिंदूंचा विरोध

पुरोला (उत्तराखंड) – येथे दोन मुसलमान तरुणांनी अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असल्याचा दावा करत संतप्त हिंदु समाज रस्त्यावर उतरला.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे २०२३ या दिवशी पुरोलातील खरसारी भागात दोन धर्मांध तरुण इयत्ता नववीत शिकणार्‍या हिंदु विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेत होते. विद्यार्थिनी दोन तरुणांसमवेत जात असल्याचे पाहून स्थानिकांना संशय आला. त्यांनी रिक्षा थांबवून चौकशी केली असता सत्यता समोर आली. पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुरोलातील संतप्त हिंदूंनी रस्त्यावर उतरून विरोध केला. त्यांनी त्या धर्मांधांना पुरोला सोडण्याची चेतावणी दिली. स्थानिक लोकांचा रोष पाहून मुसलमान समाजातील ४२ दुकानदारांनी आपापली दुकाने सोडून रातोरात पलायन केले.

विश्‍व हिंदु परिषदेचे स्थानिक नेते वीरेंद्र रावत यांनी सांगितले की, मुसलमान समाजातील लोक बाहेरून येऊन पुरोलामध्ये दुकाने उघडतात. यासमवेतच ते स्थानिक लोकांचा विशेषत: हिंदु मुलींचा बुद्धीभेद करतात. उत्तर काशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणार्‍या दोन्ही आरोपींना गजाआड केल्याचे त्यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

लव्ह जिहादचे प्रकार रोखण्यासाठी सरकार आता तरी लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा करील का ?