पुणे येथील वाघेश्‍वर मंदिरात तोकडे कपडे घालून प्रवेश करण्यावर बंदी !

श्री वाघेश्‍वर मंदिर, वाघोली

वाघोली (जिल्हा पुणे) – येथील वाघेश्‍वर हे पुरातन मंदिर आहे. येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते; मात्र दर्शनासाठी तोकडे कपडे परिधान करून येणार्‍यांची संख्या वाढत आहे. यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग पावत आहे. अन्य भविकांनी तशी तक्रार ‘ट्रस्ट’कडे केली आहे. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य राखले जावे, यासाठी वाघेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात तोकडे कपडे घालून प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. महिलांना ‘वन पीस‘, ‘शॉर्ट स्कर्ट’, ‘शॉर्ट पॅन्ट’ आदी घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. पुरुषांनाही ‘शॉर्ट पॅन्ट’ घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती ‘वाघोली विकास प्रतिष्ठान’चे अध्यक्ष राजेंद्र सातव यांनी दिली. तसा फलक मंदिरात लावण्यात आला आहे.

‘वाघोली विकास प्रतिष्ठान’चे अध्यक्ष राजेंद्र सातव

वाघोलीतील नागरिक आणि भाविक यांनी या निर्णयाचे स्वागत केले असल्याचे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रामदास दाभाडे यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी इतरही मंदिरांनी असा स्तुत्य निर्णय घ्यावा, असेच भाविकांना वाटते !