|
मुंबई – मे मासातील रणरणत्या उन्हात कर्तव्य बजावणार्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरती शेड, तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १७ मे या दिवशी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले. ‘आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल’, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
१७ मे या दिवशी दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री शिंदे ठाणे येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. तेव्हा भर उन्हात जागोजागी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलीस त्यांना दिसले. यांतील अनेक पोलीस हे वयाने ज्येष्ठ असूनही भर उन्हात कर्तव्य बजावत होते. त्यानंतर त्यांनी वरील आदेश दिले.