जम्मू – जम्मू-काश्मीरमधील हिंदूंविषयी सरकारची उदासीनता आहे. काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाला अजूनही अधिकृत मान्यता देण्यात आलेली नाही. सरकार त्यांना ‘निर्वासित’ असे संबोधते. काश्मीरमधील नरसंहाराकडे सतत दुर्लक्ष केले जाते किंवा ते नाकारले जाते, असे प्रतिपादन काश्मिरी हिंदूंसाठी कार्य करणार्या ‘पनून कश्मीर’ या संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय श्रुंगू यांनी केले. ते जम्मूमधील रूपनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित नागरिकांच्या मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपिठावर श्री. पी.एल्. बडगामी, श्री. बी.एल्. धर आणि पी.एल्. रैना उपस्थित होते. काश्मिरी हिंदूंविषयी ‘पनून कश्मीर’ने सरकारला अनेक सूचना केल्या आहेत; परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, अशी खंतही डॉ. श्रुंगू यांनी व्यक्त केली.
सौजन्य टेक वन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बेहारीलाल कौल यांनी केले. या मेळाव्यात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.