महापुरुषांविषयी अवमानकारक व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी धर्मांधावर गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर – महापुरुषांविषयी अवमानकारक व्हिडिओ ‘व्हॉट्सॲप स्टेटस’ ठेवल्याच्या प्रकरणी महमंद शेख या युवकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी सुधाकर बहिरवाडे यांनी विजापूर नाका पोलीस ठाणे येथे संबंधित व्हिडिओ दाखवून पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.

संपादकीय भूमिका

  • भारतात राहून महापुरुषांचा अवमान करणारे धर्मांध देशासाठी घातक आहेत. अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते !