भारतात अवैधरित्‍या वास्‍तव्‍य करणार्‍या बांगलादेशी नागरिकाला भिवंडीतून अटक !

घुसखोरांचा सुळसुळाट झालेला भारत !

ठाणे, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – भारतात घुसखोरी करून अवैधरित्‍या रहाणार्‍या महंमद अबू ताहेर महंमद मुफझल हुसेन (वय ४२ वर्षे) या बांगलादेशी नागरिकाला नारपोली पोलिसांनी अटक केली आहे. तो वैध कागदपत्रांविना ओळख लपवत छुप्‍या मार्गाने भारत-बांगलादेश सीमेवरून भारतात येऊन भिवंडीत वास्‍तव्‍य करत होता. (कठोर शिक्षेअभावीच बांगलादेशी घुसखोर भारतात येण्‍याचे धाडस करतात ! – संपादक) शांतीनगर, नारपोली आणि भिवंडी शहर पोलिसांनी वर्ष २०२१ मध्‍ये धाडी टाकून अवैधरित्‍या वास्‍तव्‍य करणार्‍या ४० बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती.