पुणे – शहरामध्ये किरकोळ वादातून दहशत निर्माण करण्याकरता हातात कोयते घेऊन रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांना धमकावण्याचे प्रकार वाढत आहेत. या प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलांचा लक्षणीय सहभाग दिसून येत आहे. शहरातील बोहरी आळी परिसरामध्ये गुन्हे शाखेने कारवाई करत १३५ कोयते जप्त केले आहेत. पोलिसांनी आता कोयता विक्री करणार्या व्यावसायिकांना कोयता खरेदी करतांना ‘आधारकार्ड’ घेण्याची सक्ती केली आहे, तसेच कोयता खरेदी करणार्याचे नाव आणि पत्ता नोंदवून घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. (मूळ समस्यांवर उपाययोजना आवश्यक ! – संपादक)