श्रीलंकेने मानले भारताचे आभार !

कठीण काळात श्रीलंकेला भारताचे भरघोस आर्थिक साहाय्य !

डावीकडून भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी

कोलंबो – कठीण काळात अत्यावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी भारताकडून मिळालेल्या ४ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या कर्जाच्या मोठ्या साहाय्यामुळे आम्ही काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य प्राप्त करू शकलो, असे सांगत श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर सध्या श्रीलंका दौर्‍यावर आहेत. त्यांच्याशी बोलतांना अली साबरी यांनी आभार मानले.

या वेळी डॉ. जयशंकर यांनी श्रीलंकेला येण्याचा माझा मुख्य उद्देश या कठीण क्षणांमध्ये श्रीलंकेला पाठबळ देणे, हा आहे’, असे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, भारत श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत विशेषत: ऊर्जा, पर्यटन आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांत मोठ्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देईल.