बांगलादेशातील आदिवासी हिंदूंवर मुसलमानांकडून आक्रमण !

मशिदीवरील भोंग्यांवरून करण्यात आले होते आवाहन !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील बोगरा जिल्ह्यातील शेरपूर उपजिल्हामध्ये आदिवासी हिंदूंच्या भूमीवर अतिक्रमण करण्यात आले होते. त्यानंतर मशिदीवरील भोंग्यांवरून या हिंदूंवर आक्रमण करण्याचे आवाहन करण्यात आल्यावर मुसलमानांकडून या हिंदूंवर आक्रमण करण्यात आले. यातील काही हिंदूंची प्रकृती गंभीर असून त्यांना स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने ट्वीट करून दिली आहे.

संपादकीय भूमिका

  • अशा घटनांचे वृत्त भारतातील प्रसारमाध्यमे प्रसारित करत नाहीत; मात्र भारतात अल्पसंख्यांकांवर बहुसंख्यांकांकडून आक्रमण झाल्याच्या खोट्या वृत्तांनाही ठळक प्रसिद्धी दिली जाते, हे लक्षात घ्या !
  • पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंना कुणीच वाली नाही, हे जगभरातील हिंदूंसाठी लज्जास्पद !