विकृत पोर्तुगिजांचा गोवा मुक्तीनंतर आजही उदोउदो केला जात आहे, हे दुर्दैवी  ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

आल्त-पर्वरी येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत उपस्थित हिंदूंनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ !

पर्वरी, १९ डिसेंबर (वार्ता.) – क्रूरकर्मा ख्रिस्ती धर्मप्रचारक फ्रान्सिस झेवियर याने २५० वर्षे गोव्यावर इ‌न्क्विझिशन लादले. हिंदूंना अत्यंत क्रूरपणे आणि वेचून ठार मारण्यात आले. अशा विकृत पोर्तुगिजांचा गोवा मुक्तीनंतर आजही उदोउदो केला जात आहे, हे दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांनी केले. आल्त-पर्वरी येथील श्री रामवडेश्वर संस्थान येथे १८ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत श्री. चोडणकर बोलत होते. या वेळी व्यासपिठावर गोमंतक मंदिर महासंघाचे मुख्य सचिव श्री. जयेश थळी उपस्थित होते. या सभेला उपस्थित हिंदु धर्माभिमान्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध होण्याची शपथ घेतली.

श्री. गोविंद चोडणकर

श्री. चोडणकर पुढे म्हणाले, ‘‘गोव्यातील उद्ध्वस्त मंदिरांच्या पुनरुत्थानासाठी अमुक ठिकाणी मंदिर होते, हे सिद्ध करावे लागणार आहे. हिंदू बहुसंख्य असूनही स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी संघटित नसल्याने त्यांच्या समस्यांची नोंद घेतली जात नाही. लव्ह जिहाद, हलाल जिहाद आणि लँड जिहाद यांच्या माध्यमातून भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी गुप्त कारस्थान रचण्यात आले आहे. हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी हिंदूंनी त्यांचे प्रभावी संघटन उभारणे आवश्यक आहे.’’

सभेला पू. स्वामी हरिश्रद्धानंद सरस्वती यांची वंदनीय उपस्थिती लाभली. त्यांचा सन्मान हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश प्रभु यांनी केला. सभेची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन सौ. स्वराली दवणे यांनी केले.

प्रत्येक मंदिरामधून धर्मशिक्षण चालू होणे काळाची आवश्यकता ! – जयेश थळी, गोमंतक मंदिर महासंघ

देशाला आणि गोव्याला स्वातंत्र्य मिळाले, तरी ब्रिटीश आणि पोर्तुगीज यांच्या काळात गमावलेले धार्मिक स्वातंत्र्य हिंदूंना मिळालेले नाही. आपण केवळ राजकीयदृष्ट्या मिळालेल्या स्वातंत्र्यावर समाधानी राहिलो. त्यामुळे सध्या हिंदूंची अवस्था दयनीय झाली आहे.

श्री. जयेश थळी

या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविना पर्याय नाही. त्यासाठी प्रथम हिंदूंना धर्माचे ज्ञान झाले पाहिजे. यासाठी प्रत्येक मंदिरातून धर्मशिक्षणवर्ग, बालसंस्कारवर्ग असे उपक्रम चालू होणे आवश्यक आहे. देवस्थान समित्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा.

ऋणनिर्देश

१. श्री रामवडेश्वर संस्थानने सभेसाठी सभागृह आणि तेथील व्यवस्था उपलब्ध करून दिली.
२. पर्वरीतील धर्माभिमानी श्री. आनंद मांद्रेकर आणि श्री. नवनाथ नाईक यांनी सभेच्या प्रचारात उत्स्फूर्त सहभाग घेतला. आठवडाभर आधीपासून घरोघरी जाऊन सभेविषयी माहिती देणे, परिसरातील देवस्थान समित्यांना जाऊन भेटणे, बैठका आयोजित करणे, असे उपक्रम त्यांनी स्वतःहून राबवले.
३. पर्वरीतील धर्मप्रेमी सौ. यशश्री बलेश देसाई यांनी सभेच्या आणि आदल्या दिवशी सभेची सेवा करणार्‍या कार्यकर्त्यांना दोन्ही वेळचे जेवण, तसेच चहा आणि अल्पोपहार यांची व्यवस्था स्वतःहून केली.
४. ‘डायमंड हार्डवेअर’ या आस्थापनाचे मालक श्री. आशु सरेन यांनी प्रदर्शन आणि व्यासपीठ उभारणीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले.

कृतीच्या स्तरावर प्रयत्न करण्याचा धर्माभिमान्यांचा निर्धार !

१. सभेनंतर झालेल्या बैठकीतील बैठकीत श्री रामवडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष श्री. कानोबा नाईक, धर्मप्रेमी सर्वश्री अनुज हरमलकर, प्रसाद शेट, सुभाष साळगावकर, के. के. चतुर्वेदी, बजरंग दलाचे श्री. आर्लेकर, श्री. संजय शिंदे यांनी त्यांचे विचार मांडले. आठवड्यातून एकदा देवस्थानात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यासाठी नियोजन करण्यात आले.
२. उपस्थित धर्मप्रेमींनी बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे रविवार, ८ जानेवारी २०२३ या दिवशी होणार्‍या हिंदु राष्ट्र जागृती सभेला उपस्थित रहाण्याची सिद्धता दर्शवली.
३. या सभेत बजरंग दलाचे तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनीही कृतीच्या स्तरावर हिंदु संघटनासाठी प्रयत्न करण्याचे निश्चित केले.

सभेला उपस्थित मान्यवर

१. जनहित सेवा मंडळाचे श्री. विनोद कुमार गुप्ता, श्री. जयराम विश्वकर्मा, श्री. जे. बी. चव्हाण आणि श्री. धिमईराज चौहान
२. सार्वजनिक गणेश मंडळ, पर्वरी येथील श्री. नवनाथ नाईक
३. पर्वरी येथील श्रीराम वडेश्वर संस्थानचे अध्यक्ष श्री. कानोबा नाईक
४. रा.स्व. संघ आणि बजरंग दल यांचे सर्वश्री अमित मडकईकर, प्रफुल्ल कर्णिक, प्रज्वल च्यारी, सनद आर्लेकर, किशन साळगावकर
५. शंभू महादेव संघटनेचे श्री. प्रसाद शेट
६. जॉइंट ग्रुप ऑफ पर्वरीच्या अध्यक्षा सौ. सुमित्रा रामदास नाईक
७. पर्वरी येथील ज्येष्ठ नागरिक ग्रुप सदस्य तथा समाजसेवक श्री. अनिल राजे
८. संजय नगर येथील वेताळ देवस्थानचे अध्यक्ष श्री. अनुज हरमलकर
९. उद्योजक श्री. सुरेश गावकर, श्री. रामदास नाईक,  श्री. के.के. चतुर्वेदी

क्षणचित्र

सभेनंतर झालेल्या बैठकीत कु. विनिशा मांद्रेकर प्रतिक्रिया देतांना म्हणाल्या, ‘‘मी कोणत्याही सभेला जात नाही. माझ्या वडिलांनी मला ‘काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट दाखवला, तेव्हा मला मुसलमानांच्या वृत्तीविषयी पहिल्यांदा लक्षात आले. त्यानंतर आज माझ्या वडिलांनी मला सभेला आणले. या सभेत ‘लव्ह जिहाद’चे भयावह कारस्थान समजले. या विषयी हिंदु मुलींना काहीच माहिती नाही. माझ्या संपर्कातील प्रत्येक मुलीपर्यंत हा विषय पोचवेन.’’