श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धुळे जिल्हाप्रमुख संजय शर्मा यांचे आवाहन !
धुळे – देशात आणि राज्यात लव्ह जिहाद, तसेच धर्मांतर विरोधी कायदा व्हावा, या मागणीसाठी १८ डिसेंबर या दिवशी धुळे येथे आयोजित केलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्च्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धुळे जिल्हाप्रमुख संजय शर्मा यांनी केले आहे. येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला उद्योजक श्री. गौरव जगताप, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट, राष्ट्र जागरण मंच आणि सुदर्शन न्यूजचे श्री. विवेकानंद दीक्षित, हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे उपस्थित होत्या.
‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनीचे संपादक आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. सुरेश चव्हाणके हे या मोर्च्याला संबोधित करणार आहेत. मनोहर चित्रपटगृहाजवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून सकाळी ९ वाजता या मोर्च्याला प्रारंभ होणार आहे.
हा मोर्चा आग्रा रोड मार्गे चालू होऊन फुलवाला चौक – महाराणा प्रताप स्मारक – झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मारक – नवीन महानगरपालिका येथून जाऊन क्युमाईन क्लबजवळ त्याचा समारोप होईल. त्यानंतर जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येईल.
🚩 जनसागर उमड़ पड़ा है,
यह केवल भिड़ नहीं।
खून नहीं वह पानी है,
अन्याय से जिसे चिढ़ नही।😡
✊ जागो बंधुओं भोर भई
आज नहीं तो कभी नहीं। 🙏@SG_HJS @Anushkapant3 pic.twitter.com/cSBshk7urm— Kanchan Sharma (@kanchansharma33) December 12, 2022
या वेळी करण्यात येणार्या मागण्यांपैकी काही मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –
१. बलात्कार आणि हत्येच्या सर्वच प्रकरणांत जलद गतीने न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी आणि खटला पूर्ण होईपर्यत आरोपीस जामीन मिळू नये. आरोपी दोषी ठरल्यावर राज्यकर्त्यांनी शिवछत्रपतींचा आदर्श गिरवून तात्काळ त्याचे हात पाय कलम करून चौरंगा करावा.
२. आफताबचा त्याच्यासारख्या प्रत्येक लव्ह जिहादीचा त्वरित चौरंगा करावा.
३. लव्ह जिहादविषयी प्रकरणे हाताळण्यासाठी विशेष पोलिसांची शाखा स्थापन व्हावी.
४. लव्ह जिहादसाठी मुसलमान तरुणांना प्रोत्साहित करणारे धार्मिक गुरु, संस्था, मशिदी, मदरसे शोधून त्यांच्यावर तात्काळ बंदी घालावी.
५. लव्ह जिहाद आणि धर्मांतर करण्यासाठी देशाबाहेरून अर्थ पुरवठा करणार्या संस्था आतंकवादी संघटना यांच्याशी संबंधित लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी.