शाहरुख खान यांच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ बोल असणार्‍या गाण्यात अभिनेत्रीने परिधान केले भगव्या रंगाचे अंतर्वस्त्र !

हिंदु महासभेकडून टीका !

नवी देहली – अभिनेते शाहरुख खान यांच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. यात अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी भगव्या रंगाची बिकीनी (अंतर्वस्त्र) परिधान केली आहे. या गाण्याचे बोल ‘बेशरम रंग’ असे आहेत. त्यामुळे यावर हिंदु महासभेने आक्षेप घेतला आहे. हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी म्हटले आहे की, ‘पठाण’ चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान करण्यात आला आहे.

याखेरीज या चित्रपटावर  दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनीही अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. ‘बेशरम रंग’ हे गाणे  ‘मकीबा’ या गाण्यावरून चोरले आहे, असेही अनेकांनी म्हटले आहे.

सामाजिक माध्यमांतून या गाण्याची खिल्ली उडवली जात आहे.