मुसलमान तरुणाची धर्मांतर आणि विवाह न केल्यास श्रद्धा प्रमाणे ३५ तुकडे करण्याची हिंदु तरुणीला धमकी

(प्रतिकात्मक चित्र)

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथील ब्रह्मपुरी भागात रहाणार्‍या हिंदु तरुणीला कमर नावाच्या मुसलमान तरुणाने दूरभाषवर संपर्क करून कमल असे हिंदु नाव सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिला भेटायला बोलावून शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. तरुणी बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर बलात्कार केला आणि त्या घटनेचे चित्रीकरण केले. त्यानंतर त्याने तरुणीला तो मुसलमान असल्याचे सांगत तरुणीला धर्मांतर करण्यास आणि विवाह करण्यास सांगू लागला. जर असे केले नाही, तर श्रद्धा वालकर प्रमाणे हत्या करून ३५ तुकडे करण्याची धमकी देऊ लागला.

या प्रकरणी तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्यावर कमर याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने प्रयत्न केला पाहिजे !