१. ‘जग’ आणि ‘जग’ या शब्दांत केवळ उच्चाराचा भेद आहे. जग जिंकणे म्हणजे काय ? अलेक्झांडरने जग जिंकले, म्हणजे केवळ दगड-मातीवर सत्ता प्रस्थापित केली; पण ज्याने जीवनकला आत्मसात् केली, जीवनशक्तीवर स्वत:ची सत्ता प्रस्थापित केली आणि जो जगण्यातील आनंद मिळवू शकतो, त्यानेच खरे जग जिंकले.
२. संत कितीही मोठे असोत, त्यांना प्रवास हा करावाच लागतो. त्यांच्या प्रवासातील पूर्ण प्रचीतीचे क्षण एकत्रित करून त्या प्रचीतीनुरूप त्यांना संतत्वाचे ब्रीद चिकटते.
– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’)