‘२३.१२.२०२४ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील चि.सौ.कां. सानिका जोशी यांचा विवाह पेडणे, गोवा येथील चि. संकल्प पित्रे यांच्याशी होत आहे. त्यानिमित्त साधिकांच्या लक्षात आलेली चि.सौ.कां. सानिका जोशी यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. संकल्प पित्रे आणि चि.सौ.कां. सानिका जोशी यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. काटकसरी
‘सानिका वस्तूंचा वापर विचारपूर्वक आणि काटकसरीने करते.
२. शिकण्याची वृत्ती
ती प्रत्येक सेवेकडे शिकण्याच्या दृष्टीने पहाते आणि त्यातून शिकून सेवा चांगली करण्याचा तिचा प्रयत्न असतो.
३. कलागुण
तिला गायन, कविता करणे, मेहंदी काढणे इत्यादी विविध कलांमध्ये आवड आहे.
४. प्रेमभाव
एखादी साधिका रुग्णाईत असल्यास सानिका त्यांची विचारपूस करते. ती त्यांना अल्पाहार आणि जेवण देणे इत्यादी गोष्टी प्रेमाने अन् मनापासून करते.
५. इतरांना साहाय्य करणे
तिची इतरांना साहाय्य करण्याची वृत्ती आहे. एखाद्या साधिकेने तिच्याकडे साहाय्य मागितल्यास ती प्रत्येक वेळी साहाय्य करते.
६. संयमी
तिला कधी काही अडचण असल्यासही ती शांतपणे आणि संयम ठेवून वागते.
७. सेवाभाव
अ. तिने आश्रमात विविध प्रकारच्या सेवा केल्या आहेत. ती प्रत्येक सेवा आवडीने करते.
आ. तिला सातत्याने सेवारत रहायला आवडते. ती झोकून देऊन सेवा करते. तिची प्रकृती कधी बरी नसल्यासही ती सवलत न घेता सेवारत असते.
८. भाव
तिच्यामध्ये गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या प्रती पुष्कळ भाव आहे. तिच्या बोलण्यातून गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या प्रती भाव व्यक्त होत असतो.
‘सानिकाचे वैवाहिक जीवन आनंदी होऊ दे’, अशी आम्ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो.’
– सुश्री (कु.) दीपिका आनंद (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५० वर्षे), सौ. वर्धिनी गोरल (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय २८ वर्षे), सौ. रोहिणी भुकन (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय २८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१२.२०२४)
सांगाती तुझे श्री गुरु असती ।
प्रेमळ अन् गोड असे जिचे बोलणे ।
निर्मळ अन् संयमी असे जिचे मन ।।
गुरूंच्या चरणी जिने केले समर्पण ।
अशी सानिका आरंभते आज वैवाहिक जीवन ।। १ ।।
‘जेथे जातो तेथे, तू माझा सांगाती’।
निरंतर घेऊनी या संतवचनाची प्रचीती ।।
हृदयी वसव तू मनोहर गुरुमूर्ती ।
सांगाती तुझे श्री गुरु असती ।। २ ।।
सासरी निघाली आमची सखी ।
दिल्या घरी तू रहा सुखी ।।
जपूनी मने सार्यांची ।
उधळण कर आनंदाची ।। ३ ।।
नेऊनी सासरी वसा गुरूंचा ।
झरा वाहू दे चैतन्याचा ।।
प्रपंच तुझा होण्या परमार्थमय ।
शुभेच्छा आमच्या लक्ष लक्ष ।। ४ ।।
– सौ. वैष्णवी बधाले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय २४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१९.१२.२०२४)