वांगे वातूळ असते का ?

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ७२

वैद्य मेघराज पराडकर

‘अन्नपदार्थांसंबंधी अनेक अपसमज आहेत. त्यांतीलच एक अपसमज म्हणजे ‘वांगे वातूळ असते’. वांगे मुळीच वातूळ नसते. वांगे हे वात आणि कफ यांच्यावर एक चांगले औषध आहे. छातीत कफ झालेला असल्यास वांग्याच्या ५ – ६ फोडी पाण्यात उकळून ते पाणी दिवसातून २ – ३ वेळा ४ – ५ दिवस प्यायल्यास कफ बरा होतो.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२२)