जयपूर (राजस्थान) येथे जैन मंदिरात चोरी

जयपूर (राजस्थान) – येथील जैन मंदिराचे प्रवेशद्वार तोडून आत घुसलेल्या ३ चोरांनी मंदिरातील दानपेट्या चोरून नेल्याची घटना ३० सप्टेंबरच्या रात्री घडली. सीसीटीव्हीमध्ये ही घटना चित्रित झाली आहे. या चोरांनी चेहर्‍यावर कपडा बांधल्याने त्यांचा चेहरा ओळखता येऊ शकत नाही. या दानपेट्यांमध्ये सुमारे ८० सहस्र रुपये असण्याची शक्यता मंदिर प्रशासनाने व्यक्त केली आहे. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

मंदिरात चोर्‍या होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतांना त्यावर ठोस उपाययोजना काढली जात नाही ! आता हिंदूंनीच त्यांच्या श्रद्धास्थानांचे रक्षण करण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांवर दबाव निर्माण करणे आवश्यक !