सनातन संस्थेच्या वतीने सांगली आणि मिरज येथील ग्रंथप्रदर्शन कक्षांचा प्रारंभ !

सांगली, २८ सप्टेंबर (वार्ता.) – नवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने सांगली येथील माधवनगर रस्त्यावर श्री दुर्गामाता मंदिरासमोर असलेल्या आणि मिरज येथील ब्राह्मणपुरी येथील अंबामाता मंदिरासमोर असलेल्या सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथ प्रदर्शन कक्ष यांचा प्रारंभ करण्यात आला.

सांगली येथील ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आरती करतांना श्री. उमाकांत बोंद्रे आणि कु. प्रज्ज्वल
सांगली येथील ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. उमाकांत बोंद्रे यांना ग्रंथ भेट देतांना श्री. दत्तात्रय रेठरेकर (डावीकडे), कु. प्रज्वल, सौ. प्रीती बोंद्रे (उजवीकडे)

सांगली येथील ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन हे हरिपूरचे पोलीस पाटील श्री. उमाकांत बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांच्या पत्नी सौ. प्रीती बोंद्रे, तसेच त्यांचा मुलगा कु. प्रज्ज्वल हे उपस्थित होते. हे प्रदर्शन ४ ऑक्टोबरअखेर प्रतिदिन सकाळी ९ ते रात्री ८.३० या वेळेत लावण्यात येणार आहे.

मिरज येथील प्रदर्शनाचे उद्घाटन श्री श्री यती अनिरुद्धतिर्थानंदजी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या प्रसंगी सौ. प्रज्ञा कौस्तुभ चंदुरकर-देशपांडे यांनी दीपप्रज्वलन केले.

मिरज येथील ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ग्रंथ पहातांना श्री श्री यती अनिरुद्धतिर्थानंदजी (डावीकडे) आणि श्री. द्वारकाधीश मुंदडा
मिरज येथील ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी श्री श्री यती अनिरुद्धतिर्थानंदजी (उजवीकडे) यांना श्रीफळ अर्पण देतांना श्री. द्वारकाधीश मुंदडा (डावीकडे)

हे प्रदर्शन ५ ऑक्टोबरअखेर सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत लावण्यात येणार आहे. तरी याचा जिज्ञासूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.