ब्रिटनमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

  • मंदिरामध्ये तोडफोड करून भगवा ध्वज जाळला

  • पोलिसांवर काचेच्या बाटल्यांद्वारे आक्रमण

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या लिसेस्टर शहरामध्ये १८ सप्टेंबरला मुसलमानांनी हिंदूंना लक्ष्य केल्यावर हिंदूंनीही त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही धर्मियांचा जमाव येथे जमला आणि त्यांनी एकमेकांचा विरोध करण्यास चालू केले. या वेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर काचेच्या बाटल्याही फेकण्यात आल्या. लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या जमावाने संपत्तीची हानी केली. हिंदूंच्या एका मंदिरावरील भगवा ध्वज काढून तो जाळण्यात आल्याचे एका व्हिडिओमध्ये दिसून आले. या हिंसाचाराच्या प्रकरणी २७ जणांना अटक करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुढील काही दिवस या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त रहाणार आहे. २८ ऑगस्ट या दिवशी ब्रिटनमध्ये झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. त्या नंतर ६ सप्टेंबरला उद्दाम पाकिस्तानी मुसलमानांनी लिसेस्टरमध्ये हिंदूंवर आक्रमण केले होते. त्याच संदर्भात ही घटना घडली.

१. हिंसाचाराच्या वेळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले की, लोकांनी काळ्या रंगाचे मुखवटे घातले होते. त्यांचे चेहरे आणि डोके झाकलेले होते. पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड्स लावले होते. जमाव काचेच्या बाटल्या आणि इतर अनेक गोष्टी फेकत असतांना पोलीस जमावाला मागे ढकलण्याचा प्रयत्न करत होते.

२. येथील पोलीस अधिकारी निक्सन यांनी सांगितले की, आम्हाला एका व्हिडिओची माहिती मिळाली आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती लिसेस्टरच्या मेल्टन रोडवरील धार्मिक इमारतीबाहेरील ध्वज काढतांना दिसत आहे. पोलीस अधिकारी परिसरात अनागोंदी कारभार करत असतांना ही घटना घडल्याचे दिसते. या घटनेची चौकशी केली जाईल.

३. या हिंसाचाराच्या प्रकरणी स्थानिक खासदार क्लाउडिया वेब्बे यांनी म्हटले की, आशिया चषकातील सामन्यांच्या आधीपासूनच येथे तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पहिल्यांदा हिंसाचार झाला.

अफवा पसरवून हिंदूंवर आक्रमण

येथील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हिंदूंनी मशिदीवर आक्रमण केले आणि हिंदूंकडून एका मुसलमान तरुणीचे अपहरण करण्यात आले, अशा दोन अफवा पसरवून मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. यात एका मंदिरात घुसून तोडफोड करण्यात आली. हिंदूंच्या घरांवर आक्रमणे करण्यात आली.

मुसलमानांकडून बनवण्यात आलेल्या पत्रकामध्ये संघाचा उल्लेख

बर्मिंगहॅम येथे मुसलमानांनी लिसेस्टरच्या घटनेवरून शांततापूर्ण विरोधाचे आवाहन केले होते. त्यात लिहिले होते की, आम्ही लिसेस्टरमध्ये विरोध करण्यास जात आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कट्टरतावाद्यांना आमचे पोलीस, शीख महिला, मुले आणि वृद्ध यांच्याशी खेळू देणार नाही. (‘हिंदू शिखांच्या विरोधात आहेत’, हे दाखवण्याचा मुसलमानांचा प्रयत्न लक्षात घ्या ! – संपादक)

हिंदूंनी काढला होता मोर्चा !

हिंदूंनी येथील बेलग्रेव मार्गावरून एका मोर्चा काढला होता. तेथेच मुसलमानांचा जमाव त्यांच्यासमोर आल्यानंतर एकमेकांकडून घोषणाबाजी चालू झाली. मुसलमान ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे), तर हिंदू ‘जय श्रीराम’ आणि ‘वन्दे मातरम्’च्या घोषणा देत होते.

‘लिसेस्टर ब्रह्म समाज शिवालय’ मंदिराचे अध्यक्ष मधु शास्त्री यांनी पोलिसांना पत्र लिहून मंदिरावरील झेंडा काढून तो जाळणार्‍याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच मंदिराची सुरक्षा वाढवण्यासही सांगितले आहे. येथे तणाव वाढला, तर मंदिर बंद ठेवावे लागू शकते.

पोलिसांनी मंदिरावरील आक्रमणाच्या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. मंदिरावरील आक्रमणच्या वेळी दोघे जण घायाळ झाले आहेत.

संपादकीय भूमिका

  • मागील अनेक वर्षे ब्रिटनमधील परिस्थितीचा आढावा पहाता तेथे इस्लामी कट्टरतावाद वाढत आहे; मात्र सरकारचे त्याच्यावर नियंत्रण नाही. जगाला मानवाधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्य यांचा सल्ला देणार्‍या ब्रिटनमध्ये हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवाधिकार यांचे हनन होत आहे, हे तेथील सरकारला लज्जास्पद !  
  • हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याचा मुसलमानांना प्रयत्न सार्वत्रिक असतो; कारण हिंदू मूर्तीपूजक आहेत. इस्लाममध्ये मूर्तीपूजा अयोग्य मानली जाते. त्यामुळे असे धर्मांध जगाच्या पाठीवर हिंदूंसमवेत कधीतरी एकोप्याने राहू शकतील का ?