पूरग्रस्त पाकिस्तानमध्ये ८ वर्षांच्या हिंदु मुलीला शिधा देण्याचे आमीष दाखवून दोघा धर्मांधांकडून सामूहिक बलात्कार

असहायतेचा फायदा घेऊन धर्मांधांकडून हिंदू मुलीवर बलात्कार

कराची (पाकिस्तान) – पाकमध्ये सध्या पूरस्थिती आहे. या काळात खाद्यपदार्थ मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा स्थितीत सिंध प्रांतातील शाहदादपूर येथे शिधा देण्याचे आमीष दाखवून ८ वर्षांच्या हिंदु मुलीवर २ दिवस खालीद आणि दिलशाद या दोघा तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. २८ ऑगस्ट या दिवशी ही घटना घडली.

या संदर्भातील एक व्हिडिओ ‘व्हॉईस ऑफ पाकिस्तानी मायनॉरिटी’ या ट्विटर खात्यावरून पोस्ट करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीही सिंध प्रांतातही ८ वर्षांच्या हिंदु मुलीवर बलात्कार करून तिचे डोळे फोडण्यात आल्याची घटना घडली होती.