सोव्हिएत युनियनचे माजी राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे दीर्घ आजाराने निधन

मिखाईल गोर्बाचेव्ह

मॉस्को (रशिया) – सोव्हिएत युनियनचे माजी राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. मिखाईल गोर्बाचेव्ह हे किडनीच्या विकाराने दीर्घकाळापासून आजारी होते. गेल्या काही दिवसांत त्यांचे आरोग्य चांगलेच खालावले होते. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गोर्बाचेव्ह यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला आहे. गोर्बाचेव्ह यांनी  शीतयुद्धाच्या काळात घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली होती; मात्र सोव्हिएत युनियनचे विघटन रोखण्यात त्यांना अपयश आले होते.