भाग्यनगर येथे रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांच्या हत्यांसाठी चिथावणी देणार्‍या कलीमुद्दीन याला अटक

खासदार असदुद्दीन ओवैसी व भाजपचे निलंबित आमदार टी. राजा सिंह

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील गोशामहल मतदारसंघातील भाजपचे निलंबित आमदार टी. राजा सिंह यांच्या पैगंबरांविषयीच्या कथित अवमानावरून येथे तणाव कायम आहे. मुसलमानांकडून ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. याच आंदोलनाच्या वेळी २४ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची हत्या करण्यासाठी चिथावणी देणार्‍या कलीमुद्दीन याला पोलिसांनी अटक केली आहे. कलीमुद्दीन याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात तो म्हणत आहे, ‘कापून टाका साल्यांना’ त्याच्या मागोमाग जमाव म्हणतो ‘रा.स्व. संघवाल्यांना.’

संपादकीय भूमिका

भारतातील तथाकथित असुरक्षित मुसलमान ! याविषयी आता पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडणार नाहीत !

असदुद्दीन ओवैसी यांच्या दबावामुळे पोलिसांनी केली ९० दंगलखोर धर्मांधांची सुटका !

शहरात मुसलमानांकडून टी. राजा सिंह यांच्या विरोधात आंदोलन चालू असतांना काही ठिकाणी हिंसाही करण्यात आली. तसेच शिरच्छेद करण्याच्या घोषणाही देण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी ९० धर्मांना अटक केली होती. यानंतर येथील खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पोलिसांवर दबाव आणल्याने या सर्वांची सुटका करण्यात आली. या संदर्भात एक व्हिडिओही प्रसारित होत आहे. त्यात या ९० पैकी एक जण भ्रमणभाषवर ओवैसी यांच्याशी रात्री बोलत आहे. त्यात तो ओवैसी यांचे त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न केल्यावरून आभार मानतांना दिसत आहे आणि ओवैसीही ते मान्य करत आहेत, असे दिसत आहे.

संपादकीय भूमिका

तेलंगाणामध्ये ‘तेलंगाणा राष्ट्र समिती’चे सरकार आहे कि एम्.आय.एम्.चे ? दंगलखोरांची सुटका करणार्‍या पोलिसांवर कारवाई करण्यासाठी हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी मागणी केली पाहिजे !