|
मुंबई, १९ ऑगस्ट (वार्ता.) – अमरावती येथील औषध विक्रेता उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचे अन्वेषण हे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए) करत आहे. ‘एन्.आय.ए’कडून माहिती आल्यानंतर ती सभागृहात दिली जाईल. राज्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत; म्हणून गुप्तवार्ता विभागाच्या वतीने गोपनीय माहिती घेऊन जातीय तेढ निर्माण करणार्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे, तसेच सामाजिक माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवून आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकून संबंधितांवर कारवाई करण्यात येते, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत दिली. या प्रकरणाची लक्षवेधी सदस्य राजहंस सिंह यांनी विधान परिषदेत मांडली होती. त्याला गृहमंत्री फडणवीस उत्तर देत होते.