मुसलमान रिक्शाचालकाने हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले

उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादचे आणखी एक प्रकरण उजेडात !

प्रतीकात्मक छायाचित्र

गाजियाबाद (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशमधील गौतम बुद्ध जिल्ह्यातील चाँद नावाच्या रिक्शाचालकाने हिंदु असल्याचे सांगून एका २२ वर्षांच्या हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. पीडित हिंदु तरुणीला रिक्शाचालक मुसलमान असून विवाहित असल्याचे कळताच तिने दनकौर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी पोलिसांनी रिक्शाचालकाला अटक केली आहे.

दनकौर पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, पीडित हिंदु तरुणी तिच्या कुटुंबियांसह गाजियाबाद येथे वास्तव्य करत होती. ती महाविद्यालयात प्रतिदिन रिक्शाने ये-जा करत होती. या कालावधीत तिची चाँद या रिक्शाचालकाशी ओळख झाली. त्याने स्वत:चे नाव ‘पिंटू पंडित’ असल्याचे खोटेच सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. दोघांमधील संपर्क वाढला. तो त्या तरुणीवर विवाहासाठी दबाव आणू लागला. पुढे पीडित तरुणीला त्या रिक्शाचालकाचे खरे नाव ‘चाँद’ असून तो मुसलमान असल्याचे आणि तो विवाहित असल्याचे समजले. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.

संपादकीय भूमिका

लव्ह जिहाद्यांना फाशी दिल्यासच असे प्रकार थांबतील, हे लक्षात घेऊन सरकारने त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !