कुवैत, ओमान आणि कतार या इस्लामी देशांमध्ये ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी

नवी देहली – कुवैत, ओमान आणि कतार या ३ इस्लामी देशांनी ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्यांच्या देशात बंदी घातली आहे. हा चित्रपट भारतात ३ जून या दिवशी प्रदर्शित झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटामध्ये धार्मिक सूत्र उपस्थित करण्यात आल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. ‘भारताला मुसलमान आक्रमणकर्त्यांनी लुटले. अशाच मुसलमान आक्रमणकर्त्याच्या विरोधात सम्राट पृथ्वीराज चौहान यांनी युद्ध केले’, असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका 

कुठे हिंदु सम्राट असणार्‍या पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित चित्रपटावर बंदी घालणारे इस्लामी देश, तर कुठे भारतावर ८०० वर्षे राज्य करून हिंदूंवर प्रचंड अत्याचार करणार्‍या मुसलमान आक्रमणांचा उदोउदो करणारा भारत !