भारत गाड्या विकण्याची अनुमती देत नाही, तोपर्यंत ‘टेस्ला’ नवीन गाड्या बनवणार नाही ! – इलॉन मस्क

. . . तोपर्यंत ‘टेस्ला’ नवीन गाड्या बनवणार नाही ! – इलॉन मस्क

नवी देहली – जोपर्यंत भारत त्याच्या देशात ‘टेस्ला’ने बनवलेल्या चारचाकी गाड्या विकण्याची अनुमती देत नाही, तोपर्यंत ‘टेस्ला’ नव्या चारचाकी गाड्या बनवणार नाही, असे ट्वीट ‘टेस्ला’ आस्थापनाचे मालक इलॉन मस्क यांनी केले. अनुमती देण्याआधी भारत सरकारने ‘केवळ भारतात बनवलेल्या इलेक्ट्रिक गाड्याच टेस्ला भारतात विकू शकते’, अशी अट टेस्ला आस्थापनासमोर ठेवली आहे. चीनमध्ये बनवलेल्या गाड्या भारतात विकून टेस्लाला भारतीय बाजारपेठेचा अंदाज घ्यायचा होता.

टेस्लाला भारतात कारखाना चालू करण्यापूर्वी त्यांनी बनवलेल्या इलेक्ट्रिक गाड्या भारतात आणण्यावर आयात करात सूट हवी होती, जेणेकरून टेस्लाला भारतीय बाजारपेठेतील त्यांच्या गाड्यांची मागणी तपासता येईल; मात्र भारताच्या अटीमुळे टेस्लाला असे करता येणार नाही.