१. पू. भार्गवराम यांनी रामनाथी आश्रमात जाण्यासाठी व्यक्त केलेली सिद्धता !
रामनाथी आश्रमात जायचे ठरल्यावर पू. भार्गवराम यांच्या तोंडवळ्यावर पुष्कळच आनंद दिसून येत होता.
अ. पू. भार्गवराम यांनी एक बॅग घेऊन गुरुदेवांच्या समवेत (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत) खेळण्यासाठी खेळणी आणि खाऊ भरून ठेवला.
आ. पू. भार्गवराम यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना देण्यासाठी सकाळी लवकर उठून बागेतून फुले आणली.
२. शाळेला सुट्टी लागल्यानंतर शेवटच्या दिवशी गाडीतून येतांना गाणी गाऊन आनंद व्यक्त करणे
आपण रामनाथीला जाऊया ।
आपण रामनाथीला जाऊया ।
आपण देवाला (टीप १) भेटूया ।
आपण देवीला (टीप २) भेटूया ।। १ ।।
जाऊया ना, जाऊया ना, जाऊया ना….।
जाऊया, जाऊया, जाऊया….।
आपण रामनाथीला जाऊया ।
आपण रामनाथीला जाऊया ।। २ ।।
टीप १ : देव (परात्पर गुरु डॉ. आठवले)
टीप २ : देवी (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ)
३. ‘रामनाथीला कसे जायचे’, हे पू. भार्गवराम यांनी मला विचारून घेतले. नंतर त्यांनी मोठ्या चित्रकलेच्या कागदावर (‘ड्रॉईंग शीट’वर) मंगळुरू येथून रामनाथीपर्यंतचा प्रवास दर्शवणारे चित्र काढले.
पू. भार्गवराम यांचा रामनाथी आश्रमात जाण्याचा आनंद आणि भाव पाहून माझे मन भरून आले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता!
– सौ. भवानी प्रभु (पू. भार्गवराम यांची आई), मंगळुरू, कर्नाटक. (११.४.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |