ताजमहालचे खरे स्वरूप उघड करणारी लेखमाला !
नुकतीच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठामध्ये याचिका प्रविष्ट करून आगऱ्यातील ताजमहालच्या परिसरातील २० हून अधिक खोल्या उघडण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही लेखमाला प्रसिद्ध करत आहोत. ११ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात मुसलमान आक्रमकांच्या रोजनिशीतील ताजमहालाविषयीचे सत्य आणि शिवालयाच्या पुराव्याला पुरातत्व शास्त्रज्ञांचाही दुजोरा यांविषयी वाचले. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.
भाग १. https://sanatanprabhat.org/marathi/578656.html इथे वाचा.
५. प्रसिद्ध इतिहासकार आर्.सी. मुजुमदार यांच्या मताला पुष्टी देणारे पुरावे
अ. ताजमहालच्या मुख्य घुमटाच्या कळसावर त्रिशूळ आहे. ते शिवाचे शस्त्र म्हणून प्रचलित आहे.
आ. मुख्य घुमटाच्या वरील छतावर एक साखळी लटकत आहे. सध्या या साखळीचा काहीच उपयोग होत नाही; पण मुसलमानांच्या आक्रमणापूर्वी या साखळीला एक भांडे लावण्यात येत होते आणि त्याद्वारे शिवलिंगावर अभिषेक होत असे.
इ. आताचा ताजमहाल २ माळ्यांचा आहे. खरी कबर आणि रिकामी कबर खालच्या माळ्यावर आहेत, तर २ रिकाम्या कबरी पहिल्या माळ्यावर आहेत. २ माळे असलेली शिवालये उज्जैन आणि इतर ठिकाणीही आढळतात.
ई. मुसलमानांच्या कुठल्याही वास्तूत प्रदक्षिणा मार्ग नसतो; पण ताजमहालमध्ये प्रदक्षिणा मार्ग उपलब्ध आहे.
उ. फ्रान्स प्रवासी तावेर्नियारने ‘या मंदिराच्या परिसरात बाजार भरत होता’, असे लिहून ठेवले आहे. अशी प्रथा केवळ हिंदु मंदिरातच आढळून येते. मुसलमान प्रार्थनास्थळांत असे बाजार भरत नाहीत.
ऊ. प्रख्यात लेखक कै. पु.ना. ओक यांनी या संदर्भात एक पुस्तकही लिहिले आहे.
(क्रमशः)
(साभार : साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/579253.html