ताजमहालचे खरे स्वरूप उघड करणारी लेखमाला !
नुकतीच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठामध्ये याचिका प्रविष्ट करून आगऱ्यातील ताजमहालच्या परिसरातील २० हून अधिक खोल्या उघडण्याचा आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही लेखमाला प्रसिद्ध करत आहोत. १२ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ताजमहाल हे हिंदूंचे शिवालय असल्याचे आणखी ढळढळीत पुराव्यांविषयी वाचले. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/578940.html
६. ताजमहाल हे शिवालय असल्याचे आधुनिक वैज्ञानिक प्रयोगाद्वारेही सिद्ध !
वर्ष १९७३ मध्ये न्यूयॉर्क येथील प्रॅट संस्थेचे प्राध्यापक मर्विन मिल्स यांनी ताजमहालच्या दक्षिणेस असलेल्या लाकडी दाराचा एक तुकडा अमेरिकेत नेला. तो ब्रुकलिन महाविद्यालयाचे संचालक डॉ. इव्हान विलियम्स यांना देऊन त्या तुकड्याचे वय ‘कार्बन-१४’ प्रयोग पद्धतीने ठरवण्यास सांगितले. तेव्हा ते लाकूड ६१० वर्ष (कमी-अधिक ३९ वर्ष) वयाचे असल्याचे निष्पन्न झाले. अशा रितीने ‘ताजमहाल’ ही वस्तू शहाजहानच्या आधी कित्येक वर्षांपासून अस्तित्वात होती, हे सिद्ध होते.
७. शिवालय (म्हणजे तेजोमहालय) ८६२ वर्षे जुने !
येथील मंदिरात असलेल्या शिवलिंगाला ‘तेजोलिंग’ असे नाव होते आणि मंदिराला ‘तेजोमहालय’ असे संबोधले जात. हे शिवाचे मंदिर ‘अग्रेश्वर’ या नावाने प्रसिद्ध होते. त्यावरूनच त्या शहराला ‘आगरा’ हे नाव पडले. ‘मुंज बटेश्वर आदेशा’नुसार हे मंदिर ८६२ वर्षे जुने आहे.
(वर्ष २०१७ नुसार ही आकडेवारी आहे.)
(क्रमशः)
(साभार : साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’, २८ नोव्हेंबर २००४)