मदुराई (तमिळनाडू) येथील ‘पट्टीना प्रवेशम्’ पालखी यात्रेला अनुमती !

मदुराई (तमिळनाडू) – येथील धर्मपूरम् अधिनमच्या पट्टिना प्रवेशम् या पालखी यात्रेला अनुमती नाकारणारा आदेश तमिळनाडूतील द्रमुक सरकारने (‘द्रविड मुन्नेत्र कळघम’ने म्हणजे द्रविड प्रगती संघाने) रहित केला आहे. त्यामुळे याला आपसूकच अनुमती मिळाली आहे. याआधी मयिलादुथराई जिल्हा महसूल मंडल अधिकारी जे. बालाजी यांनी अनुमती नाकारली होती.


‘पट्टिना प्रवेशम्’ म्हणजे शैव मठाच्या महंतांना पालखीमध्ये बसवून ती पालखी खांद्यावर उचलून नेण्याची परंपरा होय. मानवाधिकारांचे कारण देत याला अनुमती नाकारण्यात आली होती; मात्र मठाच्या पदाधिकार्‍यांनी हा कार्यक्रम करण्याचे ठरवले होते. हा कार्यक्रम २२ मे या दिवशी होणार आहे. ‘या प्रकरणी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी हस्तक्षेप करावा’, अशी हिंदूंनी मागणी केली होती.