संत आणि ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असणार्या साधकांसाठी सूचना !
आजवर सनातन संस्थेमध्ये शिकवण्यात येणार्या ‘गुरुकृपायोगा’नुसार साधनेमुळे १.३.२०२२ पर्यंत ११९ साधक संत (७० टक्क्यांहून अधिक पातळी असलेले) झाले आहेत आणि १११५ साधक (६० टक्क्यांहून अधिक पातळी असलेले) जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटून संतत्वाकडे वाटचाल करत आहेत. याबाबत समाजात नेहमी जिज्ञासा असते की, ‘सनातनच्याच साधकांची आध्यात्मिक प्रगती इतकी लवकर कशी होते ?’ याचे उत्तर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण’, असे असते; परंतु समाजाला त्याचे विवेचन, म्हणजे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नेमके काय शिकवले’, हे जाणून घ्यायचे असते. हा भाग सनातनचे संत आणि ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतात. यासाठी ज्या संतांनी आणि ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठलेल्या साधकांनी ‘प.पू. डॉक्टरांच्या कोणत्या शिकवणीमुळे त्यांची प्रगती झाली आहे’, हे अद्याप लिहून पाठवले नसल्यास त्यांनी पुढील पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावे. या संदर्भातील लिखाण पूर्वी लिहून पाठवले असल्यास पुन्हा पाठवू नये.
वरील लिखाण लिहून देणे, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे व्यष्टी स्तरावरील एक माध्यम आहे आणि समष्टी स्तरावर विचार केल्यास अध्यात्माच्या तात्त्विक ज्ञानाला स्वतःच्या साधनेच्या आणि अनुभूतींच्या संदर्भातील लिखाणाला संत अन् साधक यांनी जोड दिल्यास त्यातून पुढील अनेक पिढ्यांना साधना सहजतेने कळून ती करणे सोपे जाईल. हे दोन्ही उद्देश लक्षात घेऊन संत आणि साधक यांनी त्यांचे आतापर्यंतच्या साधनेचे अन् पुढच्या प्रगतीचे लिखाण नियमितपणे लिहून पाठवावे.
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’,
२४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.
पिन – ४०३४०१
संगणकीय पत्ता – [email protected]