बेंगळुरू रेल्वे स्थानकावरील हमालांच्या कक्षाला धर्मांधांनी बनवलेले प्रार्थनास्थळाचे रूप पालटले !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधाचा परिणाम !

रेल्वे स्थानकावरील हमालांच्या कक्षाला देण्यात आलेला हिरवा रंग पालटतांना हमाल

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील दक्षिण-पश्‍चिम रेल्वेच्या क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ मध्ये हमालांच्या विश्रांती कक्षाला प्रार्थनास्थळ बनवण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी याला विरोध करत रेल्वे प्रशासनाला ते बंद करण्याची मागणी करणारे निवेदन दिले होते. या विरोधाचा परिणाम होऊन प्रार्थनास्थळाला दिलेला हिरवा रंग हटवून तेथे पांढरा रंग देण्यात आला आहे. तेथे लावण्यात आलेले अरबी भाषेतील प्रार्थनेचे फलकही हटवण्यात आले आहेत. या कक्षाबाहेर नवीन फलक लावण्यात आला आहे. त्यावर ‘विश्रांती कक्ष’ असे लिहिण्यात आले आहे.

हमालांच्या कक्षाबाहेरील अरबी भाषेतील प्रार्थनेचा फलक हटवून लावण्यात आलेला ‘विश्रांती कक्षा’चा फलक