प्रजासत्ताकदिनी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा अवमान

  • राष्ट्रध्वजाऐवजी पक्षाचा ध्वज फडकावला !

  • राष्ट्रगीत पाठ नसल्याने मधली ओळ गाळली !

आतापर्यंत तृणमूल काँग्रेस पक्षाचा हिंदूविरोधी तोंडावळा समोर आला आहे, आता राष्ट्रविरोधी तोंडावळाही समोर येत आहे ! चुकीचा ध्वज फडकावणे, तसेच राष्ट्रगीत चुकीचे गाणे, हे राष्ट्रप्रेमाच्या अभावाचे उदाहरण आहे ! राष्ट्राचा असा अवमान करणार्‍यांवर सरकार काय कारवाई करणार आहे ? – संपादक

कोलकाता – तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोलकाता येथे प्रजासत्ताकदिनी देशाचा राष्ट्रध्वज न फडकावता पक्षाचा ध्वज फडकावला, तसेच राष्ट्रगीतही पाठ नसल्याने ते म्हणतांना मधली ओळ गाळत राष्ट्रगीत गायले. अशा प्रकारे कार्यकर्त्यांनी राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा अवमान केला आहे. याचा व्हिडिओ भाजपचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी त्यांच्या ट्विटरवरून प्रसारित केला आहे.


‘हे लज्जास्पद आहे’, असे त्यांनी हा व्हिडिओ प्रसारित करतांना म्हटले आहे. ‘पुरुलियाच्या रघुनाथपूर विधानसभेचे तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार पूर्ण चंद्र बौरी आणि अन्य नेते यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताचा अवमान होणे लज्जास्पद आहे, तसेच प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाऐवजी तृणमूल काँग्रेसचा ध्वज फडकावणे, हेही दुर्भाग्यपूर्ण आहे’, असेही सुवेंदु अधिकारी यांनी म्हटले आहे.