भाग्यनगर आणि विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथील पुस्तक मेळ्यामध्ये लावलेल्या सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भाग्यनगर – भाग्यनगरमध्ये १८ ते २८ डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये ३४ वा ‘हैद्राबाद पुस्तक मेळा’ आणि विजयनगरमध्ये १ ते ११ जानेवारी २०२२ या कालावधीमध्ये ३२ वा ‘पुस्तक मेळा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने तेलुगु, हिंदी आणि इंग्रजी या भाषांतील ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी लावण्यात आलेल्या संस्थेच्या धर्मशिक्षण फलकांनीही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

क्षणचित्रे

१. एका जिज्ञासूने सनातनच्या तेलुगु भाषेतील सर्व ग्रंथांचा संच खरेदी केला. त्यानंतर त्या जिज्ञासूंनी दुसर्‍या दिवशी परत येऊन त्यांच्या मित्रांसाठी तेलुगु भाषेतील ग्रंथांचे पुन्हा २ संच खरेदी केले. यासाठी ते २५ किलोमीटर दुरून आले होते.

२. एक जिज्ञासूंनी ‘स्वभावदोष निर्मूलन’ या विषयावरील इंग्रजी भाषेतील एक ग्रंथ खरेदी केला. त्या ग्रंथामध्ये अन्य संदर्भ ग्रंथांची नावे पाहिल्यानंतर ते पुन्हा प्रदर्शनाच्या ठिकाणी आले आणि ते सर्व ग्रंथ घेऊन गेले. या वेळी ते म्हणाले, ‘‘ग्रंथामध्ये दिलेले सर्व विषय जीवनामध्ये प्रयत्न करण्यासारखे आहेत. मला अतिशय छान वाटले.’’

३. सात्त्विक उत्पादनांमधून येणारा सुगंध जिज्ञासूंना ग्रंथ प्रदर्शनाकडे खेचून घेत होता.

४. विजयवाडा येथे एका जिज्ञासूने स्वत:हून तेलुगु भाषेतील ग्रंथांचा संच खरेदी केला. त्यांनी सांगितले की, वर्ष २०२० मध्ये मला तुमच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी शेवटच्या दिवसापर्यंत येता आले नाही. मागील वर्षी पुस्तक मेळा लागला नव्हता. भगवंताच्या कृपेने मला या वेळी तुमचे प्रदर्शन मिळाले.

५. विजयवाडा येथील प्रदर्शनावर आलेल्या एका जिज्ञासूने ग्रंथ प्रदर्शनातील सर्व प्रकारच्या ग्रंथांची मागणी केली. त्याने तेलुगु आणि इंग्रजी भाषेतील सर्व मोठे ग्रंथ अन् लघुग्रंथ खरेदी केले.


वैशिष्ट्यपूर्ण

१. प्रदर्शनाच्या ठिकाणी असे लक्षात आले की, अनेक जिज्ञासू सनातन संस्थेला विविध माध्यमांतून ओळखतात. अनेक जण ‘सनातन पंचांग ॲप’, यू ट्यूब चॅनल, व्हॉॅट्सॲप अशी विविध सामाजिक माध्यमे दाखवून ते ‘आपणच (सनातन संस्था) आहात ना ?’, असे विचारणा करायचे. या वेळी अनेकांनी ‘समाजात तुम्ही अतिशय चांगले कार्य करत आहात’, असे सांगितले.

२. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे पुस्तक मेळा आयोजित करण्यात आला नव्हता. त्यामुळे अनेक जिज्ञासू सनातनच्या साहित्यासाठी वाट पहात होते. अनेक जण सनातनच्या प्रदर्शनावर येऊन साधकांची विचारपूस करत होते. ‘ग्रंथ आणि सात्त्विक वस्तू यांच्यासाठी आम्ही वाट पहात होतो’, असे सांगत होते.

३. एक जिज्ञासू म्हणाले की, मी संपूर्ण पुस्तक मेळा फिरून पाहिला; परंतु केवळ तुमच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी जीवनोपयोगी ग्रंथ आढळून आले. मला येथूनच ग्रंथ खरेदी करायचे आहेत.